wadawni 
मराठवाडा

पोलिस छाप्यात आढळली वडवणीत विनापरवाना दारु

मच्छिंद्र मोरे

वडवणी - गणपती विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात येथील सदिच्छा नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदा दारुसाठा आढळून आला. माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी (ता. २३) रात्री ही कारवाई केली. 

गणेश विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी दारु दुकाने आणि बिअर बार बंदचे आदेश होते. तरीही कोठे दारु विकली जात आहे का याची तपासी सुरु होती. यावेळी वडवणी पासून एक किलोमिटर अंतरावर असणाऱ्या हॉटेल सदिच्छा येथे उपविभागिय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्या पथकाने धाड टाकत विना परवाना बेकायदेशीर रित्या दारू साठा उघड केला. तसेच हॉटेल मध्ये बंद च्या काळात बेकायदेशीर रित्या चोरटी दारूविक्री करत असताना हॉटेल मॅनेजर आढळून आल्याने कार्यवाही करत एकूण ४२ हजार रुपयांची विदेशी दारु जप्त केली.

या प्रकरणी पोलिस नायक अमृत क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र गर्जे व हॉटेलचे मालक भारत जगताप यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
तपास पोलीस निरीक्षक सुरेश खाडे हे करत आहेत.

राजकीय क्षेत्रातले बडे प्रस्थ
दरम्यान बेकायदा आणि विनापरवाना दारू साठा आढळलेले सदिच्छा हॉटेल हे भारत जगताप यांचे असून जगताप हे वडवणीतील बडे राजकीय प्रस्थ आज. छापा आणि गुन्हा नोंद झाल्याने वडवणीत चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

Latest Marathi News Live Update : अनुदानित खतांची विक्री आजपासून बंद

Jalgaon farmer: बापाची हृदयद्रावक धडपड! शेती वाचवण्यासाठी दोन मुलांना औताला जुंपून पाडल्या सरी, जळगाव जिल्ह्यात कुटुंबाची पोटासाठी धडपड..

Mahua Barfi : घरच्या घरी कशी बनवायची हमीरपूर स्टाईल 'महुआ बर्फी'? पाहा साहित्य आणि बनवण्याची संपूर्ण सोपी विधी!

El Nino 2026 : चिंता वाढली! प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय; पावसावर आणि शेतीवर होणार मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT