file photo 
मराठवाडा

Video: उरुस यात्रेत धारदार शस्त्राचा साठा जप्त ;  औरंगाबाद्च्या चौघांना अटक

गणेश पांडे

परभणी : येथील उरुस यात्रेत चोरट्या व अवैध पध्दतीने धारदार शस्त्रे विक्री करणाऱ्या औरंगाबाद येथील चार जणांना अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी (ता.१७) छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे, मोबाईल व रोख रक्कम असा ३६ हजार ३३० रुपयां मुद्देमाल हस्तगत केला आहे. उरुस यात्रेत झालेली ही सर्वात मोठी कारवाई समजल्या जात आहे.

उरुस यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. देशभारतील व्यापारी या ठिकाणी त्यांची दुकाने लावत असतात. त्यामुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून अनेक समाज विघातक लोक ही या यात्रेत येऊन अवैध पध्दतीने त्यांचे व्यवसाय करतात. यावर पोलिसांची करडी नजर असते. सोमवारी (ता.१६) अतिरिक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांना उरुस यात्रेत काही लोक शस्त्रांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांना शोधून अटक करण्याची जबबादारी विशेष पथकाकडे देण्यात आली. विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पांचाळ यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दर्गा परिसरातील मुख्य कमानीच्या बाजूला लावण्यात आलेल्या जनरल स्टोअर्स या दुकानात धारदार शस्त्रे
विक्री होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली.

 चौघांना घेतले ताब्यात
 या पथकाने सोमवारी (ता.१७) रात्री साडेऊन वाजता या दुकानावर जावून छापा मारला. या ठिकाणी शेख अजिम शेख अकबर (वय ३०, रा. बिल्किस मशिदीजवळ, मकसुद कॉलनी, रोशनगेट औरंगाबाद), शेख रहिम शेख अकबर (वय २८, रा. बिल्किस मशिद जवळ मकसुद कॉलनी औरंगाबाद), सय्यद फेरोज सय्यद रज्जाक (वय २२, रा. मिसळवाडी, औरंगाबाद), सलमान पठाण फय्याज पठाण (वय २३ रा. मिसळवाडी, इब्राहीम कॉलनी, औरंगाबाद) या चौघांना ताब्यात घेतले. सदर दुकानाची तपासणी केली असता या दुकांनात लपवून ठेवलेला शस्त्राचा साठा पोलिसांना सापडला. उरुस यात्रेतील यंदाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटने प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार जगदीश रेड्डी यांच्या फिर्यादीवरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस करित आहेत.

हेही वाचा - चार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामास मंजुरी

अशी आहेत शस्त्रे
पाच गुप्त्या, एक मोठा लोखंडी खंजीर, पाच लहान लोखंडी खंजीर, फायर सारखे साचे असलेले आठ लहान खंजिर, एक मोठा लोखंडी चाकू, दोन लहान लोखंडी चाकू, आठ धारदार चाकू असे एकूण ३० तिक्ष्ण हत्यार



यांनी बजावली कामगिरी
उरुस यात्रेत करण्यात आलेल्या या कारवाईत विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पांचाळ यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत कच्छवे, पोलिस हवालदार सखाराम टेकूळे, पोलिस हवालदार जगदीश रेड्डी, पोलिस कॉन्स्टेंबल श्रीकांत घनसावंत, पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांदे, महिला पोलिस शिपाई पुजा भोरगे, चालक गजेंद्र चव्हाण यांनी मिळून केली.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रेग्नंट पत्नी गाडीत, मला जाऊ द्या', पतीचा भररस्त्यात ठिय्या; राज्यपालांसाठी रस्ता बंद केल्यानं वाहतूक कोंडी, VIDEO VIRAL

Navi Mumbai: लेकाकडून आई-वडिलांचा अमानुषपणे छळ, मारहाण करत घरातून हाकललं अन्...; निर्दयी मुलाच्या कृत्याने नवी मुंबईत खळबळ

'ती सध्या काय करते' तेजश्रीसाठी अंकुश चौधरीची खास पोस्ट, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई! अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार?; फडणवीसांची माहिती

गुरु गोचरामुळे दोन राशींच्या लोकांची होणार प्रगती ! जाणून घ्या आजचे तुमचे आर्थिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT