Manoj Jarange 
मराठवाडा

Manoj Jarange: जरांगेंवर कोण टेहळणी करतंय? आंतरवलीत घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Manoj Jarange Drones Over house: मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामासाठी आहेत. यावेळी सरपंचाच्या घरावर ड्रोन घिरट्या घालत आहे. गावाच्या सरपंचांनी फोनवरून याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

जालना- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहळणी होत असल्याचं समोर आलं आहे. गावाच्या सरपंचानी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याप्रकरणी गावाचे सरपंच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी देखील अशा पद्धतीने ड्रोन गावात पाहायला मिळाला होता असं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामासाठी आहेत. यावेळी सरपंचाच्या घरावर ड्रोन घिरट्या घालत आहे. गावाच्या सरपंचांनी फोनवरून याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

सहा तारखेपासून मनोज जरांगे यांची शांती यात्रा सुरू होणार आहे. त्याआधीच हा टेहळणीचा प्रकार समोर आला आहे. ड्रोनद्वारे टेहळणी कोण करतंय असा खरा प्रश्न आहे. पोलीस यासंदर्भात काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतरवाली सराटीमध्ये २६ जूनला ड्रोन घिरट्या घालत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री आणखी दोन ड्रोन गावावर घिरट्या घालत होते. गावाच्या सरपंच कौशल्याबाई तारख आहेत. याच ठिकाणी मनोज जरांगे मुक्कामी आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात ड्रोन घिरट्या घालत आहे. एक ड्रोन गावामध्ये घिरट्या घालत होता.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंतरवाली सराटी हे गाव प्रसिद्ध झालं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र हे गाव बनलं आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही टेहळणी केली जात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकारामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. रात्री काही गावकरी जागून पाहारा ठेवत आहेत. पोलिसांना याबाबत अद्याप काही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे ड्रोनचं गुढ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT