With advent of android mobiles multiplexes traveling cinemas touring talkies in Yatra became outdated Sakal
मराठवाडा

अँड्रॉइड मोबाईल, मल्टिप्लेक्स, विविध वाहिन्यांचा जमाना येताच, यात्रेतील फिरते सिनेमागृह (टुरिंग टाॅकीज) झाले कालबाह्य!

यात्रेतील तंबुतील सिनेमा पाहण्यास गावखेड्यातील नागरिक गर्दी करत होते.मात्र, ऑनराईड मोबाईल,विविध चित्रपट असलेल्या वाहीन्या अन् मल्टिप्लेक्सचा जमाना आल्याने फिरत्या सिनेमागृहाला घरघर लागली आहे.

भास्कर सोळंके

जातेगाव - ग्रामीण भागातील नागरिकांची मनोरंजन करणारे फिरते सिनेमागृह(टुरिंग टाॅकीज)कालबाह्य झाली आहेत. यात्रेतील तंबुतील सिनेमा पाहण्यास गावखेड्यातील नागरिक गर्दी करत होते.मात्र, ऑनराईड मोबाईल,विविध चित्रपट असलेल्या वाहीन्या अन् मल्टिप्लेक्सचा जमाना आल्याने फिरत्या सिनेमागृहाला घरघर लागली आहे.

साधारण १५-२० वर्षापूर्वी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एक महिनाभर चालणा-या त्वरीता मातेचा यात्रेत सिनेमागृह नसल्याने टुरिंग टाॅकीजच्या माध्यमातून सिनेमा दाखवत होते. चार महिन्याचा पावसाळा वगळता फिरते सिनेमागृह(टुरिंग टाॅकीज)गाव- गावात

जाऊन चित्रपट दाखवत गावखेड्यातील नागरिक यांचे मनोरंजन करत होते.मात्र,आता ऑनराईड मोबाईल, मल्टिप्लेक्स, विविध चित्रपट वाहिन्यांचा जमाना येताच टुरिंग टाॅकीज कडे प्रेक्षकवर्ग यांनी पाठ फिरवली. दोन तीन दिवसात प्रदर्शित झालेला सिनेमा चित्रपट वाहीनी अन् मोबाईलवर येत असल्याने थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघणा-यांच्या संख्येत घट झाली.

यात्रेतील'चला चला,पळा पळा,सुरु झाला,असा कानी पडणारा आवाज देखील बंद झाला आहे.साधारण पंधरा वर्षापूर्वी यात्रेतील टुरिंग टाॅकीज मध्ये सिनेमा पाहण्यास जागा मिळत नसे,एवढी गर्दी होत होती.मात्र, दरम्यानच्या काळात टिव्हीवर तसेच मोबाईलवर घरी बसून सिनेमाचा आनंद मिळत असल्याने यात्रा- जत्रेतील फिरते सिनेमागृह(टुरिंग टाॅकीज)कालबाह्य झाले आहेत.

स्टोरी,गाणे,डाॅयलाग होती तोंडपाठ

मोकळ्या जागेत बसुन यात्रेत टुरिंग टाॅकीज मध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेत असलेला प्रेक्षक हे रात्रीत तीन तीन सिनेमे पहात होते.चित्रपट पाहून आल्यावर यामधील गाणी,स्टोरी आणि डाॅयलाग अगदी तोंडपाठ असायची,याचा आनंद अगदी वेगळाच होता.या आनंदाला ब्रेक लागला असून, मोबाईलने एकमेकांचा संवाद देखील हरवत चाललेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

Latest Marathi News Live Update : लखनौमध्ये दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग

SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

"चुकीच्या माणसांमुळे आयुष्यात खूप मोठी किंमत मोजली," सोनाली कुलकर्णीने व्यक्त केली खंत ; म्हणाली…

SCROLL FOR NEXT