women protest for maratha reservation Sarees Bangles sent to MLA by post politics Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रणरागिणींचा एल्गार; पोस्टाद्वारे पाठवल्या मराठा आमदार,खासदारांना साडीचोळी, बांगड्या

मनोज जरांगे यांच्या सभेची तयारी पूर्ण भोकरदन; सकल मराठा समाजाच्यावतीने सभेसाठी करण्यात आले नियोजन

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीसाठी भोकरदन तालक्यातील महिला रणरागिणी (ता.२८) शनिवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. एल्गार मोर्चा काढीत सकल मराठा समाजाच्या महिलांनी मराठवड्यातील मराठा आमदार, खासदारांना पोस्टाद्वारे बांगड्या, साडी चोळी पाठवून संताप व्यक्त केला.

राज्यात नव्हे तर देशात गाजलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथील मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आमरण उपोषण पुन्हा सुरू झाले आहे.

उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना पाठींबा व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी शनिवारी भोकरदन तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या महिलांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मुख्य रस्त्याद्वारे आरक्षणासंदर्भात विविध घोषणा देत एल्गार मोर्चा काढला.

यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात मौन बाळगून असलेल्या सर्वपक्षीय मराठा आमदार व खासदार यांच्या विरोधात जोरदार घोषणााजी करण्यात आली. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदार व खासदार यांना साडी, चोळी, बांगड्या, टिकली, हळदी, कुंकू असलेले पार्सल पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. दुपारी एक वाजता पोस्ट ऑफिस परिसरात राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT