BEED SAKAL
मराठवाडा

अंबाजोगाईत यंदा साजरा होणार योगेश्वरीचा नवरात्रोत्सव

१९ महिन्यांनंतर खुले होणार मंदिर ; देवीच्या गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : मागील १९ महिन्यापासून बंद असलेले योगश्वरी मंदिर मंगळवारी (ता.७) दर्शनासाठी खुले होणार आहे. याच दिवशी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. परंतु अद्यापही भक्तांना देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश असणार नाही. या उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम व पूजेचे साहित्यही आत नेण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे भक्तांना फक्त दर्शन घेता येईल.

राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरीचा हा नवरात्रोत्सव दसरा महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगेश्वरी देवी अंबाजोगाईकरांची ग्रामदैवता व कोकणस्थांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोनाच्या महामारीमुळे हे मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर फक्त दोन महिने हे मंदिर खुले झाले होते. मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने मंदिर बंद करण्यात आले होते. तब्बल १९ महिने हे मंदिर बंद ठेवण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होत आहे.

या दिवशी सकाळी नऊ वाजता तहसीलदार विपिन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना होऊन दसरा महोत्सवास प्रारंभ होईल. महापूजा व इतर धार्मिक विधी दररोज होतील. परंतु अजूनही कोरोनाचे निर्बंध असल्याने भजन, कीर्तन, संगीत व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश नसणार, बाहेरूनच कासवा पासून भक्तांना दर्शनास प्रवेश असेल. याच ठिकाणी देवीची उत्सव मूर्ती आहे. तेथूनच हे दर्शन घ्यावे लागणार आहे. बुधवारी (ता.१३) पूर्णाहुतीचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता.१५) दसऱ्यानिमित्त योगेश्वरीची पालखी मंदिरातच निघेल. बाहेर सार्वजनिक मिरवणूक निघणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT