मुक्तपीठ

'निळाई'चे कुटुंब 

स्वाती देशपांडे

छत्तीस तासांचा प्रवास करून भल्या पहाटे पहिल्या पोस्टिंगच्या गावी उतरले, इतक्‍यात स्त्री-पुरुषांचा घोळका सस्मित मुद्रेने आमच्या दिशेने येताना दिसला. जवळ येताच त्यांच्यापैकी एका बाईंनी "वेलकम टु एअरफोर्स' असे म्हणत एक सुंदरसा पुष्पगुच्छ माझ्या हाती ठेवला.

एका हवाई दल अधिकाऱ्याची पत्नी या नात्याने हवाई दलाच्या वातावरणाशी झालेली ती माझी पहिली ओळख! आम्ही पोचल्याच्या तिसऱ्याच दिवशी नवऱ्याचे काही मित्र सकाळीच हजर झाले. "आता मराठी मुलगी स्क्वॉर्डनमध्ये आली म्हटल्यावर श्रीखंडाचा बेत झालाच पाहिजे, नाही का?' असे म्हणत त्यांनी चार-पाच किलो दह्याचे पातेले माझ्यासमोर ठेवले अन्‌ मग "येतो आम्ही नाइट फ्लायिंग झाल्यावर स्वीट डिश खायला,' असे सांगत मंडळी परतलीही.

आयुष्यातील उण्यापुऱ्या वीस वर्षांत कधी एकटीने हा प्रयोग केला नाही, याची जाणीव झाली अन्‌ माझ्या पोटात गोळाच आला; पण मग शांतपणे विचार करून कृती आठवली व पंचे, सुती साड्या वगैरे वापरून "एकमेका साहाय्य' करत आम्ही चक्का बनवला आणि अखेर अंदाजपंचे दाहो दरसे करत श्रीखंडही तयार झाले, तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. पहिल्याच पोस्टिंगमध्ये मला अगदी वेगवेगळ्या समाजस्तरांतून आलेल्या बायका भेटल्या. कुणी थेट पंजाबच्या छोट्याशा गावाकडची, तर कुणी हवाईसुंदरी म्हणून कार्यरत असलेली. कुणी हिंदीचा गंधही नसलेली दक्षिणी, तर कुणी एखादी गुजराथी बेन! परंतु हवाई दलाच्या परिवारात आल्यावर सर्वजणी तिथल्या "निळाई' त सामावून गेल्या.

हवाई दलातल्या महिला अधिकारी हा तर एक खासच गट. त्यांच्यातला आत्मविश्वास, तडफ आणि कर्तव्यनिष्ठा हे पाहून कुणाचीही मान अभिमानाने उंचावतेच. अशा अनेक अधिकाऱ्यांपैकी एकीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मध्य प्रदेशातल्या छोट्याशा गावातून आलेल्या नमिताचे पती हवाई दलात अधिकारी होते. परंतु लग्नानंतर अडीच वर्षांतच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. पदरात लहान मुलगी असूनही नमिताने धीर सोडला नाही, तिने वायुसेना अकादमीतले कठीण प्रशिक्षण पूर्ण केले. आता ती हवाई दलात एक यशस्वी अधिकारी आहे. 

अनेक प्रकारच्या अनुभवांना गाठीशी बांधत आता आमचा वायुसेनेतला प्रवास जरी संपला असला, तरीही ती शिदोरी सतत कामी येत असते. पुढेही उपयोगी पडेल हे नक्कीच! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT