6-year-old boy beaten by teacher for not knowing English case filed against teacher police station  esakal
मुंबई

Mumbai : इंग्रजी येत नसल्याने ६ वर्षीय मुलाला शिक्षिकेची अमानुष मारहाण

शिक्षिकेवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

- प्रकाश लिमये

भाईंदर, ता.१६ (बातमीदार): इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग वाचता येत नसल्यामुळे खासगी शिकवणी घेणार्‍या शिक्षिकेने सहा वर्षीय मुलाला छडीने अमानुष मारहाण केल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे. पोलीसांनी शिक्षेकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पश्चिम येथील गणेश देवल नगर येथे रहाणार्‍या सहा वर्षीय मुलाचे इंग्रजी कच्चे असल्यामुळे पालकांनी त्याला खासगी शिकवणी लावली होती. ११ मे रोजी हा मुलगा शिकवणीला गेला असताना त्याला इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग वाचता येत नसल्यामुळे शिक्षिकेने हाताने तसेच छडीच्या सहाय्याने पाठीवर, हातावर तसेच डोक्यावर अमानुष मारहाण केली.

ही गोष्ट मुलाने आपल्या आजीला सांगितली. मुलाच्या पाठीवर छडीचे वळ पाहून मुलाच्या आजीने भाईंदर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी शिक्षिकेवर गुन्हा केला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला नोटीस बजावण्यात आली असून तीला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT