मुंबई

मुंबई, ठाण्यातून 88 वन्यजीवांची तस्करी; दोन जणांना वनविभागाकडून अटक

मिलिंद तांबे

मुंबई: वन विभागाने मुंबई-ठाण्यात शुक्रवारी केलेल्या कारवाईत 88 वन्यजीवांची सुटका केली. तसेच वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांच्या वनविभागाने मुसक्या ही आवळल्या. या तस्करीमागे एखादी मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता वनविभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत. सुटका केलेल्या वन्यजीवांमध्ये कासव, पोपट आणि खारींसह सहा प्रजातींचे 88 वन्यजीव आहेत.

लॉकडाऊनचा फायदा उचलत तस्करांची टोळी सक्रिय झाली आहे. अशा तस्करांवर वन विभागाने कारवाई सुरू केली असून  मुंबई-ठाण्यासारख्या शहरातून वन्यजीवांच्या तस्करांना ताब्यात घेण्याचा धडाका लावला आहे. यात दोन आठवड्यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर विभागाने काळवीटाच्या कातडीची, तर ठाणे गुन्हे शाखेने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले. 

शुक्रवारी ठाणे वन विभागाने वन्यजीवांच्या तस्करांवर धाड टाकून मुंबई आणि ठाण्यात एकूण सहा प्रजातींचे 88 वन्यजीव ताब्यात घेतले. या  कारवाईत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी  'वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन (डब्लूएए) यांच्या मदतीने ही कारवाई केली.

मुंबईवरुन काही तरुण ठाण्यातील विवियाना मॉल परिसरात पोपटांची तस्करी करण्यासाठी आले होते. त्याची माहिती मिळताच वन विभागाने सापळा रचून या तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून काही पोपट ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत मुंबईत आणखी काही वन्यजीव असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे, ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी सांगितले. त्यानुसार मुंबईत मारलेल्या धाडीत एका घरातून काही वन्यजीव ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लालबाग येथील एका घरातून खार, पोपट आणि कासव मिळाले. या कारवाईतून 3 प्रजातींचे एकूण 38 पोपट, 16 इंडियन टॅन्ट टर्टल, 24 इंडियन ब्लॅक स्पॉटेड टर्टल आणि 10 खारी ताब्यात घेण्यात आल्या. हे जीव वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत परिशिष्ट 1,2,4 मध्ये संरक्षित आहेत. कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून लालबागमधील तरुणाला पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

88 wildlife smugglers from Mumbai Thane two arrested by forest department

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT