Aditya Thackeray Sakal
मुंबई

'आरे आंदोलन' आदित्य ठाकरे यांच्या अंगलट?; राष्ट्रीय बालहक्क आयोगाची नोटीस

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मेट्रो कारशेडच्या विरोधात काल आंदोलन केले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती पण आदित्य ठाकरे यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या आंदोलनात लहान मुले पोस्टर घेऊन सहभागी होते यामुळे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(Arey Protest And Aditya Thackeray)

आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केली आहे अशी तक्रार एका संस्थेने केली असून त्यानंतर ठाकरेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान काल 'आरे बचाव' हे आरे येथील जंगल वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात लहान मुलांना सहभागी होण्याची परवानगी नसताना लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता.

यावर सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना या नोटीसीत देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई शहरातील मेट्रोच्या पार्किंगसाठी सुरू असलेल्या आरे कारशेडच्या कामाला भाजप सरकार असताना मंजूरी मिळाली होती पण यासाठी शिवसेनेचा विरोध होता आणि पुढे उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकाराच्या कार्यकाळात या कामाला स्थगिती देण्यात आली होती. पण आता शिंदे आणि भाजप सरकार आल्यानंतर आता हे काम परत सुरू केले जाणार असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे शिवसेना या प्रकल्पाला विरोध दर्शवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

SCROLL FOR NEXT