Crime Sakal
मुंबई

Dombivali News : गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारे चौघे अटकेत; कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे चुलत भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची सोमवारी सायंकाळी तोडफोड करण्यात आली होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे चुलत भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची सोमवारी सायंकाळी तोडफोड करण्यात आली होती.

याप्रकरणी सागर गायकवाड यांच्या तक्रारीवरुन मानपांडा पोलिसानी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. चार जणांना पोलिसांनी अटक केली असून स्वरूप सोरटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोनार, करण गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. राजकिय वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात होते मात्र अशी वादाची पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, तिसगाव भागात आमदार गायकवाड यांचे चुलत भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे एका गाळ्यामध्ये जय मल्हार, श्री साई केबल नावाने कार्यालय आहे. सोमवारी सायंकाळी या कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अनोळखी इसम चावी लावत असल्याचे पाहताच दुचाकीस्वार सागर गायकवाड याने त्यास हटकले.

त्याचा राग आल्याने नशेत असलेल्या या तरुणाने कार्यालयात घुसून सागरला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यानी मारहाण केली. यानंतर त्याने आपल्या आणखी 5 साथीदाराना बोलावून घेतले. सागरला सोडविण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल भिसे मध्ये पडताच त्यालाही मारहाण करून जखमी केले.

तोंडावर, नाकावर, मानेवर मारहाण केल्यानंतर त्यांच्यापैकी कोणीतरी कार्यालयाच्या काचा फोडून या काचेच्या तुकड्याने सागरच्या मनगटावर वार करत त्याला जखमी केले. केबल कार्यालयात जाऊन तेथील तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचारी घाबरले.

कार्यालया बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारहाण, तोडफोडीचा प्रकार कैद झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणातून चारही हल्लेखोरांची ओळख पटवत त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान हा वाद भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील नसून कार्यकर्त्यानी शांत राहावे असे आवाहन कोळसेवाडी पोलिसांनी केले आहे. तर या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र कल्याण पूर्वेतील मागच्या काही महिन्यातील घटना पाहता, पोलीस करतात तरी काय सवाल उपस्थिती केला जात आहॆ. तर कोळसेवाडी पोलिसांना अजून सतर्क राहण्याची गरज आहॆ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT