Mumbai Ahmedabad Highway Accident sakal
मुंबई

कार चालकाचे नियंत्रण सुटले अन् चार जणांनी गमावला जीव

अपघातात चार जण जागीच मृत्यूमुखी तर तिन जखमी

महेंद्र पवार

महेंद्र पवार, कासा

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीजवळ कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील बार्डोली येथील कार मुंबईच्या दिशेने जात होती. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसवर आदळली. कारमधील चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की कार चक्काचूर झाली होती. कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस आणि कासा पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातात लक्झरी बसमधील तीन प्रवासी जखमी झाले.

मृतांची नावे

मोहम्मद अब्दुल सलाम हापिसजी (वय 36), इब्राहिम दाऊद (वय 60), आशियाबेन कलेक्टर (वय 57) इस्माईल मोहम्मद देसाय (वय 42) अशी मृतांचे नावे आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या पाणीप्रश्नावर पालिकेला विहिरींची आठवण, विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना

अमेरिकेत हिंदू मंदिरात नरसंहाराचा कट, गोळीबार करताना ट्रिगर जाम झाल्यानं अनर्थ टळला, १९ वर्षीय तरुणाला अटक

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांच्या लेकाचा संयम संपला; नाव न घेता दिलं उत्तर; म्हणाला- मी त्यांना एवढंच सांगेन...

Latest Marathi News Update : कराड येथील कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद, माजी खासदार राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल

Mohol Sugarcane Protest: ऊसदराचा तिढा पुन्हा पेटला! पहिली उचल पाच हजार रुपये द्या; कुरुलमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला

SCROLL FOR NEXT