Action against contractor delay in cleaning drains Dipesh Mhatre inspected drains mumbai sakal
मुंबई

Mumbai : नाले सफाईत दिरंगाई झाल्यास कंत्राटदारावर कारवाई

युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी नाल्यांची केली पहाणी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीमधील नाल्यांत प्रचंड प्रमाणात कचरा आहे. पावसाळ्यात हे नाले तुडूंब भरुन वहात असल्याने परिसरात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील निवासी परिसरातील नालेसफाई कामाची पहाणी बुधवारी युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी केली.

दोन दिवसानंतर पुन्हा कामाची पाहणी करण्यात येईल. कामात निष्काळजी पणा केला तर कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल. कामे योग्य पद्धतीने करा असा सज्जड दम यावेळी म्हात्रे यांनी कंत्राटदारांना दिला.

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाला कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

पावासाळ्यात कल्याण ग्रामीण भागातील एमआयडीसी निवासी भागात नाले तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते.रस्त्यावर पाणी सचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेना प्रदेश सचिव व माजी स्थायी समिती सभापती दिपेश यांनी एमआयडीसी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, स्थानिक पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दीपेश म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.पुन्हा दोन दिवसात पूर्ण नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार आहे.या परिसरातील नालेसफाईमध्ये निष्काळजी पणा केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT