मुंबई

मुंबईत गेल्या 24 तासात 1134 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे

मुंबई : राज्याप्रमाणेच मुंबईत आज 1,134 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,35,357 झाली आहे. मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,385 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,101 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे. 

मुंबईत आज नोंद झालेल्या 32 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 24 पुरुष तर 8 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 32 रुग्णांपैकी 21 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,101 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,09,369 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 85 दिवसांवर गेला आहे. तर 21 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,97,368  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  15 ऑगस्ट  ते 21 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.82 इतका आहे. 

मुंबईत 608 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,795 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 6,009 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,185 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT