Accident Sakal
मुंबई

अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या गाडीला कंटेनरची धडक

कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीला एका कंटेनरने धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

शर्मिला वाळुंज

कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीला एका कंटेनरने धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

डोंबिवली - कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीला एका कंटेनरने धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

नेवाळी नाका येथे स्पीड ब्रेकरवर चालकाने गाडी स्लो करताच मागून येणाऱ्या कंटेनरने ही धडक दिली आहे. सुदैवानं यामध्ये कुणालाही इजा झालेली नाही. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे हे सोमवारी सायंकाळी मलंगगड परिसरात आले होते. ललिता पंचमीला मलंगगडावर होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी शिंदे हे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि परिमंडळ ४ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह मलंगगडावर आले होते. तिथून परतत असताना नेवाळी पोलीस चौकीजवळ त्यांची गाडी येताच समोर स्पीड ब्रेकर आल्यानं चालकाने ब्रेक मारत गाडीचा वेग कमी केला.

यावेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचं बरंच नुकसान झालं असलं, तरी सुदैवानं अतिरिक्त आयुक्त शिंदे आणि त्यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांना काहीही इजा झालेली नाही.

याप्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद परवेझ खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT