Accident  Sakal
मुंबई

Accident : टॅटू काढायला मुंबईत आली पण परतलीच नाही; एअर होस्टेसवर काळाने घातला घाला

तिने दुसरी एअरलाईन जॉईन केली होती आणि काही दिवसांतच तिची नव्या कंपनीत जॉयनिंग होणार होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टॅटू काढून टाकण्यासाठी मुंबईत आलेल्या एका एअर होस्टसचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अध्वर्यू भांडेकर (२७) या मर्चंट नेव्हीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भांडेकर हा तरूण BMW कार चालवत असताना ही कार महापालिकेच्या डंपरला जाऊन धडकल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, पल्लवी भट्टाचार्या (२९) असं मृत तरूणीचं नाव असून भांडेकर हा गाडी चालवत असताना ती त्याच्या शेजारी बसली होती. तर गाडीमध्ये अंकित खरे (३८) आणि भारती राय (२४) असे त्याचे दोन मित्रही बसलेले होते. यावेळी जुहू परिसरातून जात असताना त्यांची गाडी महापालिकेच्या उभ्या असलेल्या डंपरला मागून धडकली. यामध्ये पुढे बसलेल्या पल्लवीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून भांडेकर आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.

दरम्यान, पल्लवी भट्टाचार्या ही कोलकत्ता येथील असून ती मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत काम करत होती. ती एअर होस्टेस असून तिने तो जॉब सोडून दुसरी एअरलाईन जॉईन केली होती. यावेळी तिला कंपनीच्या नियमानुसार तिच्या शरीरावर असलेला टॅटू काढून टाकण्यास सांगण्यात आलं होतं.

त्यामुळे ती लेझर टॅटू रिमुव्हर या तंत्रज्ञानाने टॅटू काढण्यासाठी मुंबईत आली होती. तिची आणि भांडेकर याची पहिल्यापासून ओळख होती. त्यामुळे तिने भांडेकर याच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला होता.

साकीनाका येथे पार्टी करून अंधेरी येथील घरी परतत असताना भांडेकर याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या अपघातानंतर पल्लवी हिच्या कुटुंबियांनी भांडेकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भांडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT