मुंबई

लॉकडाउन कधी संपेन माहित नाही पण, आलीया भट्ट हा चित्रपट करणार पुर्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्टुडंट ऑफ द इअर या करण जोहरच्या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या आलिया भटने अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळविली. महेश भटची ही मुलगी कितपत भरारी घेईल अशी शंका काहींनी त्यावेळी व्यक्त केली होती. परंतु आलियाने विविध चित्रपट आणि त्यातील विविध भूमिका साकारून सगळ्यांची तोंडे बंद केली आणि आपण या इंडस्ट्रीत लंबी रेस खेळणार असल्याचे ठणकाऊन सांगितले. आज आलियाची गणती टाॅपची नायिका म्हणून होत आहे. आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये तिने स्वतः ची टॉप अभिनेत्रींमध्ये जागा बनवली आहे. आजवर तिने अनेक हिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले. 2020 या वर्षातही तिचे बरेच चित्रपट लाईनअप आहेत. मात्र आता कोरोनाचं संकट देशावर असताना या सर्व चित्रपटांचे चित्रीकरण थांबले आहे.

तिचा यावर्षीचा चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे 'गंगुबाई काठियावाडी'.संजय लीला भन्साळींचा हा बिग बजेट चित्रपट आहे. आलियाकडे सध्या बरेच चित्रपट असल्यामुळे लाॅकडाऊन संपल्यानंतर नेमक्या कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार याचीच चर्चा रंगलेली आहे. पण सध्या  या चित्रपटाबद्दल एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाचे चित्रीकरण सर्वात आधी सुरू होणार आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अशोक दुबे यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. या चित्रपटाचा सेट जमीनदोस्त केल्याच्या चर्चा बरेच दिवसांपासून सुरू होत्या, मात्र या चर्चा खोट्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर आलिया सर्वात आधी चित्रीकरण करणार हे तर नक्की आहे, लॉकडाऊन कधी संपेल याचा काहीही अंदाज लावला जात नाही. मात्र आलिया संजय लीला भन्साळींचा चित्रपट अगोदर पूर्ण करणार आहे हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT