mumbai sakal
मुंबई

अरुण गवळी गँगच्या खंडणीखोर सदस्याला अटक

एपीएमसी व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : एपीएमसी APMC मार्केटमधील market व्यापाऱ्यांना धमकावून Threatening त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी APMC पोलिसांनी अटक केली आहे. अशोक हंसराज सोणकर Ashok Hansraj Sonkar ऊर्फ अशोक मिर्ची Ashok Mirchi (वय ३४) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो अरुण गवळी गँगचा सदस्य आहे. नुकताच तो तुरुंगामधून सुटला होता. त्याच्यावर एपीएमसी APMC पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी अशोक मिर्ची हा सराईत गुन्हेगार असून बुधवारी दुपारी तो एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यासाठी गेला होता. या वेळी त्याने भाजी मार्केटमधील मयूर बारवे याला आपण या मार्केटमधील भाई असल्याचे व नुकतेच तुरुंगातून सुटून आल्याचे सांगून धमकावले. तसेच मार्केटमध्ये धंदा करायचा असेल तर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून हप्ता न दिल्यास मारून टाकण्याची धमकी त्याने मयूरला दिली. या प्रकारानंतर बारवे याने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असताना आरोपी कृष्णा बार समोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुमेध खोपीकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी कृष्णा बारजवळ सापळा लावून त्याला अटक केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT