Uddhav Thackeray esakal
मुंबई

Uddhav Thackeray: "मी सुट्टी घेतली माफी मागतो, पण आता..."; उद्धव ठाकरे असं का म्हणाले? विधानसभेसाठी मोठी तयारी

Uddhav Thackeray: विधानसभेच्या दृष्टीने पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निकालात विधानसभेत मिळालेल्या मतांची आकडेवारी या अहवालात समाविष्ट करावी, असे उद्धव यांनी संपर्कप्रमुखांना सांगितले आहे.

Sandip Kapde

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. काल बुधवार शिवसेना भवनात राज्यभरातील २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने विधानसभा संपर्कप्रमुखांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना आपपल्या विधानसभेचा अहवाल सादर करण्याचे सर्व नेत्यांना कळवले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितले की विधानसभा निवडणुकीपर्यंत कुणालाही सुट्टी नाही. तसेच परदेश दौऱ्यासाठी सुट्टी घेतल्याबद्दल त्यांनी स्वतः माफी मागितली आहे.

विधानसभेच्या दृष्टीने पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निकालात विधानसभेत मिळालेल्या मतांची आकडेवारी या अहवालात समाविष्ट करावी, असे उद्धव यांनी संपर्कप्रमुखांना सांगितले आहे. हा अहवाल विधानसभेच्या संपर्क अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीत लढवली जाणार असली तरी 288 जागांची तयारी करून मजबूत करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.

पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, ठाकरे यांनी सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांशी बोलून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे.

26 जून रोजी राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीच्या दोन घटकांनी निश्चित केलेल्या जागावाटपानुसार शिवसेना मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून लढणार आहे, तर काँग्रेस कोकण पदवीधर मतदारसंघातून लढणार आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल परब आणि जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात आहेत.

शिवसेनेचे अनिल परब आणि जगन्नाथ अभ्यंकर हे मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT