PM Modi 
मुंबई

Atal Setu: मुंबईतील 'अटल सेतू'च्या उद्घाटनावेळी PM मोदींनी काढली शिंजो अबेंची आठवण; म्हणाले, आम्ही...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतू-मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचं उद्घाटन पार पडलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतू - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांची आठवण काढली. या प्रकल्पामध्ये त्यांचाही मोठा वाटा असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच महाराष्ट्र आणि देशातील विकासाची माहिती दिली. (atal setu innauturated by pm narendra modi remembers japan former pm shinzo Abe)

मोदी म्हणाले, आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा आहे. आमच्या संकल्पाचं हे प्रमाण आहे की आम्ही भारताच्या विकासासाठी समुद्राला देखील टक्कर देऊ शकतो, लाटांनाही चिरुन पुढे जाऊ शकतो. कोरोनाच्या महासंकटातही मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडचं काम पूर्ण होणं हे महत्वाचं काम आहे. आमच्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट हा भारताच्या निवनिर्माणाचं काम आहे, अशा प्रत्येक प्रोजेक्टच्या माध्यमातून भारताच्या विकासाचं काम आम्ही करतो आहोत. (Latest Marathi News)

मुंबई आणि महाराष्ट्रातील ३३,००० कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन झालं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिनचं सरकार तयार झालं होतं तेव्हापासून सर्व मोठे प्रोजेक्ट्स काम सुरु झालं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी मी माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांची आठवण जरुर काढेन कारण आम्ही दोघांनी मिळून या प्रकल्पाचं स्वप्न पाहिलं होतं, जे आज प्रत्यक्षात उतरतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT