ATC Action Bangladesh person arrested Terrorism mumbai crime esakal
मुंबई

Mumbai Crime News : घाटकोपरमधून बांग्लादेशी अटकेत; एटीसीची कारवाई

आरोपीला एका व्यक्तीने मदत केल्याचे पोलीस चौकशीतून समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील घाटकोपरच्या भटवाडी परिसरात एका संशयित बांग्लादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख असे आरोपींचे नाव असून तो गेल्या सात वर्षांपासून अवैधरीत्या नवी मुंबईतील घणसोली येथे बेकायदेशिररित्या राहत असल्याची माहिती आहे. आरोपीला यासाठी एका व्यक्तीने मदत केल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

सापळा रचून अटक

घाटकोपर येथील भटवाडी परिसरात एक संशयीत बांग्लादेशी नागरिक येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाला एटीसीला मिळाली होती. त्यानुसार घाटकोपर परिसरात एटीसीने सापळा रचला होता.

रविवारी 2 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एक व्यक्ती तेथे आली. पोलिसांच्या खबऱ्याने तीच व्यक्ती बांग्लादेशी नागरिक असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता व्यक्तीचे नाव आलामीन ऊर्फ आलम मुजबीर शेख असल्याचे कळले.तसेच तो घणसोली गाव येथे वास्तव्याला असल्याचे त्याने सांगितले.

बांगलादेशी असल्याचे उघड

आरोपीकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यानंतर बांग्लादेशातील जामरील येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.

त्याच्या अंगझडतीत मोबाईल संचासह त्याने घणसोली येथे मोहम्मद शेख नावाने जन्माचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्याची पावती पोलिसांना सापडली. भारतात राहण्यासाठी त्याला घणसोलीतील महमूद शेख नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT