मुंबई

उगाच 'हिरोपंती' करु नका, मुंबई पोलिसांचा सल्ला

काय म्हटलय मुंबई पोलिसांनी

दीनानाथ परब

मुंबई: मुंबई पोलिसांनी (Mumbai police) टायगर (tiger shroff) आणि दिशा (disha patani) विरोधात केलेल्या कारवाईचा दाखल देत उगाच रस्त्यावर फिरुन 'हिरोपंती' करु नका, असा मुंबईकरांना सल्ला दिला आहे. "सध्या व्हायरस विरोधात युद्ध सुरु आहे. वांद्रयामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या दोन कलाकारांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे. IPC च्या कलम १८८, आणि ३४ अंतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली" अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. "आम्ही सर्व मुंबईकरांना अनावश्यक 'हिरोपंती' (Heropanti)टाळण्याची विनंती करत आहोत" असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. (avoid unnecessary Heropanti mumbai police tweet)

प्रसिद्ध अभिनेता टायगर श्राँफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) विरोधात मुंबई पोलिसांनी FIR नोंदवला आहे. या दोघांनी कोविड नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर केला आहे. हे दोघंही बँण्डस्टँड परिसरात फिरत होते. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस जशा प्रकारे कारवाई करत आहेत, त्याप्रमाणे पोलिसांनी या दोघांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहे. याचा फायदा अनेकजण घेताना दिसत आहेत. त्याला बॉलीवूडमधील (bollywood celebrities) सेलिब्रेटींचाही अपवाद नाही. प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफ (tiger) आणि दिशा पटानी (disha) हे दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना पकडले. आणि त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Honey Singh News: हनी सिंगचा पाय आणखी खोलात? महाराष्ट्र सायबर सेलने काय दिला अल्टिमेटम?

दमदार संवाद, प्रभावी अभिनय; पण एक गोष्ट खटकते! कसा आहे राजकुमार रावचा ‘प्रहार’?

Marathi News Live Updates: लोणावळ्यातील बनावट कॉल सेंटर मधून अमेरिका-कॅनडातील नागरिकांची आर्थिक फसवणूक

Ankita Bhandari Case: २४ तासांत बेड्या अन् ८८ दिवसांत ५०० पानांचे चार्जशीट; महिला DIG च्या नेतृत्वाखालील SIT तपास ठरला निर्णायक

SCROLL FOR NEXT