mumbai sakal
मुंबई

शाळेच्या बांधकामाचा ठेका मिळविण्याच्या वादातून ठेकेदाराला मारहाण

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका ठेकेदाराला दुसऱ्या ठेकेदाराने व त्याच्या सहकार्‌यांनी बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शाळेच्या (School) बांधकामाचा ठेका मिळविण्याच्या वादातून कोपरखैरणे (Kōparakhairaṇē) येथे राहणाऱ्या एका ठेकेदाराला (contractor) दुसऱ्या ठेकेदाराने (contractor) व त्याच्या सहकार्‌यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. कोपरखैरणे (Kōparakhairaṇē) पोलिसांनी (Police) या प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव संदेश म्हात्रे असून तो कोपरखैरणेत राहतो. तर त्याला मारहाण करणारा ठेकेदार महेश पाटील कोपरखैरणे गावात राहतो. संदेश आणि महेश हे दोघे कोपरखैरणे सेक्टर-२० मधील लालबहादूर मिशन शाळेच्या बांधकामाचे कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात होते. सदरचे कंत्राट संदेशला मिळाले होते. गत मे महिन्यामध्ये संदेश म्हात्रे हा शाळा बांधकामाच्या ठिकाणी गेला असताना, त्याठिकाणी मित्रासह गेलेल्या महेश पाटील याने संदेशला कन्स्ट्रक्शनचे काम सोडून देण्यास धमकावले होते. तसेच त्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संदेशने महेश पाटील व अक्षय या दोघांविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे महेश पाटील याचा संदेशवर राग होता.

याच रागातून महेशने १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास संदेशला पकडून शाळा बांधकामाच्या कंत्राटावरून वाद घातला. त्यानंतर महेश व त्याचे मित्र रोहन सालीयन व आकाश या तिघांनी संदेशला बेदम मारहाण शाळेचे कंत्राट न सोडल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या संदेशने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला होता. त्यानंतर त्याने महापालिकेच्या रुग्णालयत उपचार घेऊन कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT