Crime esakal
मुंबई

Bhiwandi Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून भिवंडी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून तिघे फरार आहेत.

पीडितेस तिच्या मित्राने २ ऑक्टोबर रोजी खारबाव भागातील घरात बोलावले होते. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या तरुणाने त्याच्या सहा मित्रांना या ठिकाणी बोलावले आणि सर्वांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यादरम्यान समाज माध्यमांवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पीडितेने रविवारी (ता. १५) तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली; तर इतर तीन आरोपी फरार आहेत. दरम्यान अटक आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting : सिल्व्हर ओकवर शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची भेट; चर्चांना उधाण, दोन्ही गट एकत्र येणार?

किती रुपयांत बुक करू शकता नवी कोरी Tata Tiago EV फेसलिफ्ट? जाणून घ्या बूकिंगची साधी सोपी प्रोसेस

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News नागपुरात पोलिसांवर हल्ला, कार अंगावर घालण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT