amit shah 
मुंबई

Amit Shah in Mumbai: अमित शाहांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बंद दाराआड चर्चा; आमदार अपात्रता विषयी...

कार्तिक पुजारी

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वप्रथम भाजप नेते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. याठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते.

महाराष्ट्रात सध्या आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचं बोललं जातंय.

सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. त्यांनी अधिक वेळ न लावण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर नार्वेकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन तुषार मेहता यांची भेट घेतली होती. तसेच इतर कायदा तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय.

शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुनावणीवेळी समोरासमोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नार्वेकरांकडून तसे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे या दिवसाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. यासंबंधी निर्णय घेतला जातो की आणखी वेळ लागतो हे सोमवारी कळेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT