पनवेलमध्ये १० उमेदवार रिंगणात 
मुंबई

पनवेलमध्ये भाजप-शेकापमध्ये लढत

दीपक घरत : सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले सेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांचा समावेश असून, उरलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. 

अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजप युती आणि शेकाप आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाटील यांनी शिवसेना युती धर्माचे पालन करणार असल्याने "मातोश्री' वरून सूचना येताच क्षणाचाही विलंब न लावता अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पनवेलसाठी भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकाप आघाडीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांमध्ये थेट दुरंगी लढत होणार हे जवळपास निश्‍चित झाले होते. युतीतील जागा वाटपामध्ये पनवेल मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्याने उमेदवारीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी सेना-भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

सेनेच्या जिल्हा सल्लागारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केल्याने दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते अचंबित झाले होते. पनवेल मतदारसंघात सेनेचा हवा तेवढा प्रभाव नाही; मात्र मतदारसंघात सेनेला मानणारी हक्काची १५ ते २० हजार मते असून १ लाखाचे मताधिक्‍य मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सेनेच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात खीळ बसण्याची शक्‍यता होती. पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप नेत्यांच्या लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍य घेण्याच्या निर्धाराचा वारू चौफेर उधळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीचा धर्म मानतात. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत आपापल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते. "मातोश्री'वरून सूचना येताच क्षणाचाही विलंब न लावता अर्ज मागे घेतला आहे. 
- बबन पाटील, जिल्हा सल्लागार, शिवसेना

१) प्रशांत राम ठाकूर- भाजप 
२) फुलचंद मंगल किटके - बहुजन समाज पार्टी 
३) प्रवीण सुभाष पाटील- बहुजन मुक्‍ती पार्टी 
४) मानवेंद्र यल्लाप्पा वैदू- महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी 
५) राजीव कुमार सिन्हा- इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी 
६) हरेश मनोहर केणी- शेकाप 
७) अरुण राम म्हात्रे- अपक्ष 
८) कांतीलाल हरिश्‍चंद्र कडू- अपक्ष 
९) संजय गणपत चौधरी- अपक्ष 
१०) हरेश सुरेश केणी- अपक्ष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT