Chitra-Wagh-Sanjay-Raut 
मुंबई

सांगा, संजय राऊत कोणाचं थोबाड फोडलं पाहिजे - चित्रा वाघ

"१४ वर्षाच्या मुलीवर ३० जणांनी त्याठिकाणी सामूहिक बलात्कार केला. मला भीती आहे, येणाऱ्या दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही"

दीनानाथ परब

मुंबई: डोंबिवलीत (Dombivali) अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार (Rape) प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला अटकाव करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. अजून महिला आयोगाला अध्यक्ष नाही. शक्ती कायद्याचा अतापता नाही" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

"राज्यात बलातकाऱ्यांना राजाश्रय दिला जातोय. त्यामुळे विकृतांचं मनोबल वाढताना दिसतय. त्यामुळेच राज्यातील महिला आणि मुली बळी पडतायत. अतिशय दुर्देवी, संतापजनक आणि चीड आणणारी गोष्ट आहे. १४ वर्षाच्या मुलीवर ३० जणांनी त्याठिकाणी सामूहिक बलात्कार केला. मला भीती आहे, येणाऱ्या दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही" असे चित्रा वाघ म्हणाल्या.

"रोजची कायदा-सुव्यवस्था ढासळत आहे. म्हणूनच विशेष अधिवेशन बोलवण्याची आम्ही मागणी केली होती. ज्याला अतिशय वाईट पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं" असं चित्रा वाघ म्हणाल्या. "मला सर्वज्ञानी संजय राऊतांना विचारायच आहे, त्यांनी राज्यपालांना सांगितलं, विरोधकांच थोबाड फोडायला पाहिजे. मला आता संजय राऊतांना विचारायच आहे, कोणाचं थोबाड फोडलं पाहिजे. तुमच्यात सरकारच थोबाड फोडण्याची हिम्मत आहे का? सरकारला प्रश्न विचारण्याची हिम्मत आहे का?" असा सवाल विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT