mumbai sakal
मुंबई

कल्याणमध्ये भाजपाचे शंखनाद आंदोलन

ठाकरे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप

रविंद्र खरात

कल्याण : महाराष्ट्र (Maharashtra) वगळता देशातील अन्य राज्यांतील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली असून संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे (Thackeray) सरकारने बार सुरूआणि मंदिर-धार्मिक (Temple) स्थळे बंद ठेवले असून ती सूरु करण्यासाठी भाजपाच्या (BJP) राज्यव्यापी आंदोलनात कल्याण (Kalyan) पूर्व मधील प्रसिद्ध तिसाई देवी मंदिरा समोर भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली  भाजपा (BJP) आणि आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आज सोमवार (Monday) ता 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास  शंखानाद आंदोलन करण्यात आले

राज्यातील ठाकरे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचा आरोप भाजपा आध्यात्मिक कल्याण जिल्हा अध्यक्ष ह .भ.प.चंद्रभान सांगळे महाराज यांनी केला सभा , निवडणूक , मोर्चे , दारूचे दुकाने चालतात , मंदिरे सुरू झाल्यास कोरोना वाढतो असला कुठला न्याय असा सवाल यावेळी सांगळे यांनी केला .

या काळ्या निर्णयाविरेधात आणि मंदिरे-धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणीकरिता भारतीय जनता पार्टी  अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार ता 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास कल्याण पूर्व मधील प्रसिद्ध तिसाई देवीच्या मंदिरा समोर  टाळ, घंटा, शंख वाजवत मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे , अश्या घोषणा देत भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आध्यात्मिक कल्याण जिल्हा अध्यक्ष भ.प.चंद्रभान सांगळे महाराज, अभिमन्यू गायकवाड , सुभाष म्हस्के , संदीप तांबे , रवि हराळे , निलेश म्हात्रे , अरुण दिघे , वंदना मोरे , प्रिया जाधव , हेमलता पावशे , पांडुरंग भोसले आदींनी सहभाग घेतला

कल्याण पश्चिम मध्ये ही आंदोलन .....

भाजपा माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम मधील लाल चौकी परिसरातील गणपती मंदिर या मंदिराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केले या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी  मंदिर बंद आपले सरकार उघडले बार "उद्धवा धुंद  तुझे सरकार" मंदिर बंद गरिबांचे हाल ठाकरे सरकार मालमाल अश्या प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी करत मंदिर बंद विरोधात आंदोलन केले असून या पुठे मंदिर न उघडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT