BMC Diwali Bonus 2022 22500 bonus announced Mumbai Municipal Corporation employees sakal
मुंबई

BMC Diwali Bonus 2022 : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी २२,५०० बोनस जाहीर

मुंबई महापालिका कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रुपये; तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिका कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रुपये; तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली.

‘कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे, पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,' असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना ‘आनंदात दिवाळी साजरी करा, पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन केले. बैठकीस खासदार राहुल शेवाळे, आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना बोनसमुळे दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT