मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचा जीव धोक्यात, कोण उठलंय मुंबई महापौरांच्या जीवावर ?

सुमित बागुल

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा जीव धोक्यात आहे. कारण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार गेल्या महिन्यात २१ तारखेला म्हणजेच २१ डिसेंबर रोजी धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने किशोरी पेडणेकर यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिव्या देत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

यानंतर मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ तारखेच्या संध्याकाळी सहा वाजता अज्ञाताने फोन करून धमकी दिली होती. फोनवर बोलणारा व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होता. सोबतच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ देखील करत  होता. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी त्यांना धमकीचा फोन आल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी याबाबत अत्यंत गुप्तता बाळगली आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ट्रेस केलेलं आहे आणि शेजारील राज्यामधून लवकरच या व्यक्तीला अटक देखील करण्यात येणार आहे. 

मुंबईत महापालिका निवडणुकांची गरामगरमी वाढली आहे. अशात सर्वच पक्षांकडून मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यादरम्यान सर्वच पक्षांकडून आपापल्या विरोधकांवर चिखलफेक सुरु आहे. यानंतर किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आला आहे.  

BMC mayor kishori pednekar gets life threatening call from unknown person

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT