मुंबई

Bollywood News: जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाच्या याचिकेवर २ फेब्रुवारीला होणार फैसला

सकाळ वृत्तसेवा

गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात आपल्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती द्या अशी मागणी करत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक हे या याचिकेवर २ फेब्रुवारी रोजी निकाल सुनावणार आहेत.

बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप कंगनाने केला होता तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगना विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला असून माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप कंगनाने केले असल्याचे जावेद अख्तर यांचे म्हणणे आहे. तर कंगनाने सुद्धा जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हेगारी कट, खंडणी व इतर आरोप करत विरोधी तक्रार दाखल केली. अंधेरी कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप रद्द केला व इतर आरोपांप्रकरणी अख्तर यांना २४ जुलै २०२३ मध्ये समन्स बजावले.

अख्तर यांनी या समन्स विरोधात दिंडोशी न्यायालयात धाव घेतली दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत राणावतच्या तक्रारीवरून न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली ही स्थगिती उठल्यानंतर कंगना विरोधात दाखल केलेल्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कंगनाने हायकोर्टात या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत ऍड रिझवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केली. त्यावर आज न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SCROLL FOR NEXT