file photo 
मुंबई

गाईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी लाच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गाईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी 300 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाबाबत सोलापूरमधील पशुविकास अधिकाऱ्याला तब्बल 29 वर्षांनी दिलासा मिळाला. पुरेशा सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली आहे.

अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार, नोव्हेंबर 1991 मध्ये नागनाथ कदम यांनी एक जर्सी गाय खरेदी केली होती. या गाईचा विमाही काढण्यात आला होता. ही गाय आजारी पडल्यावर पशुविकास अधिकारी मधुकर सोनावणे यांनी उपचार करून 300 रुपये शुल्क मागितले. त्यानंतर दोनच दिवसांनी या गाईचा मृत्यू झाला. त्यामुळे विमा रक्कम मिळवण्यासाठी कदम यांनी मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली. त्यासाठी सोनावणे यांनी 500 रुपये लाच मागितली; मात्र 300 रुपयांत तडजोड झाली, असा आरोप होता.

या प्रकरणी कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून सोनावणे यांना पकडण्यात आले. त्यांनी 100 रुपये स्वतःसाठी व 200 रुपये अन्य एक डॉक्‍टरसाठी घेतल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला. तथापि, विशेष न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले. त्याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर न्या. के. आर. श्रीराम यांच्यापुढे सुनावणी झाली.

साक्षीदारांचा जबाब आणि पुराव्यांमधील तफावतीमुळे न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. अन्य आरोपीचे सुनावणीदरम्यान निधन झाले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT