रासायनिक सांडपाणी वाहून नेणारे नवीन पाईप जळून खाक झाले आहेत.  
मुंबई

महाडमध्‍ये आगडोंब; सांडपाणी वाहून नेणारे नवीन पाईप भस्‍मसात

सकाळ वृत्तसेवा

महाड : मुंबई-गोवा महामार्गालगत राजेवाडी फाट्यानजीक लागलेल्या आगीत रासायनिक सांडपाणी वाहून नेणारे नवीन पाईप जळून खाक झाले आहेत. आगीत दहा पाईप भस्मसात झाल्याने ठेकेदाराचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले. 

महाड औद्योगिक वसाहतीची सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन महामार्ग रुंदीकरणात बाधित होत आहे. बाधित होणारी पाईपलाईन ठेकेदार असलेल्या एल अँड टी कंपनीकडून बदलून देण्यात येत आहे. याकरता नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी राजेवाडी, वडवली ते थेट ओवळे याठिकाणी खाडीत सोडले जाते. मात्र ही पाईपलाईन महामार्ग रुंदीकरणात बाधित होत असल्याने नांगलवाडी ते राजेवाडीदरम्यान बदलण्याचे काम एल ऍण्ड टी मार्फत केले जाणार आहे.

एक पाईप बारा मीटर लांबीचा असून अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा असल्याचे एल ऍण्ड टीचे प्रकल्प व्यवस्थापक जगमोहन नायडू यांनी सांगितले. हे काम एमआयडीसीचे असले तरी रुंदीकरणात बाधित पाईप बदलण्याचे काम ठेकेदार कंपनी करत आहे, असे शाखा अभियंता आर. बी. सूळ यांनी सांगितले.

हे नवीन पाईप महामार्गालगत ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ज्या ठिकाणी पाईप ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी अचानक आग लागल्याने हे पाईप जळून खाक झाले.

प्लास्टिकच्या प्रकारातील हे पाईप जळू लागल्याने परिसरात काळ्या धुराचे लोट उठले. जवळच भंगार अड्डे असल्याने रासायनिक प्लास्टिक किंवा द्रव पेटले की काय, अशी शंका परिसरात निर्माण झाल्याने एकच घबराट पसरली. आग आटोक्‍यात आणण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने प्रयत्न केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT