Police Constable esakal
मुंबई

Police Constable : गुन्ह्याच्या प्रकरणात नाव लावू नये, म्हणून सात लाखांची मागणी; लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

शर्मिला वाळुंज

हवालदार टिकेकर पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांना याविषयी कळविले.

डोंबिवली : एका गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव समाविष्ट करू नये, यासाठी तक्रारदाराकडे सात लाख रूपयांची लाच मागणाऱ्या, तसेच तडजोडीनंतर पाच लाख रूपये स्वीकारण्यास तयार झालेल्या कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील (Mahatma Phule Chowk Police Station) हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर (वय 40) यांच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराच्या मित्राच्या मेहुण्या विरूध्द महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात मेहुण्याला आरोपी करण्यात येऊ नये, यासाठी तक्रारदार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हवालदार (Police Constable) सुचित टिकेकर यांच्याकडे आग्रह केला होता.

दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात मेहुण्याला आरोपी करायचे नसेल तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सात लाख रूपये लागतील, अशी मागणी टिकेकर यांनी तक्रारदाराकडे केली. गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. तक्रारदाराने सात लाखांमध्ये काही तडजोड करण्याची विनंती केली, त्यावर टिकेकर हे पाच लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाले.

हवालदार टिकेकर पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांना याविषयी कळविले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टिकेकर आणि तक्रारदार यांच्यात फोनवर होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवली होती. यात हवालदार टिकेकर फसले.

तक्रारदाराकडे लाच मागत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी टिकेकर याच्या विरोधात या संदर्भातील तांत्रिक पुरावे जमा केले. त्या आधारे सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विजय कावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात बुधवारी हवालदार सुचित टिकेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन 2018) चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी लाचविरोधी पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT