CHAIN SNATCHING.jpg 
मुंबई

Navi Mumbai Crime : महिलेचे दागिने लांबवले ; गळ्याला झाली जखम

सकाळ डिजिटल टीम

महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे दागिने लांबवल्याची घटना घणसोली येथे घडली. यात महिलेच्या गळ्याला जखम झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

कोपरखैरणे येथील रहिवासी मालन विष्णु जरे या घणसोलीत एका घरी मुलांची देखभाल करण्याचे काम करतात. सोमवारी (ता.११) त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. रात्री ९ः३० वाजता काम संपल्यावर त्या आपल्या मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा पाठीमागून आलेल्या दुचाकीवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील लक्ष्मीहार आणि सोन्याच्या दोन माळा जबरदस्तीने खेचल्या.

यावेळी मालन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या मानेवर जोरात फटका मारला. दागिने घेऊन चोरांनी घणसोली बस डेपोच्या दिशेने पलायन केले. मालन यांनी आरडाओरडा केला, पण कुणीही मदतीसाठी आले नाही. त्यानंतर त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT