प्रेमसंबंध तुटलेल्या मध्य प्रदेशच्या एका तरुणीकडूनही आरोपीने पुन्हा संबंध सुरळित करण्याच्या नावाखाली ४० हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे त्यांनी अनेकांना फसवल्याचे वनराई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले. 
मुंबई

‘लव्ह गुरू’चा लाखोंचा गंडा

सकाळवृत्तसेवा

जामिनावर सुटका; प्रेम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
गोरेगाव - प्रेमात वियोग आलेल्याना पुन्हा एकत्रित करून देण्याचा दावा करणाऱ्या तसेच प्रेम मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कथित लव्ह गुरूला वनराई पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांत आलेल्या विविध तक्रारींवरून पोलिसांनी कारवाई करीत राजस्थान गाठून या लव्ह गुरूला तुरुगांत डांबले. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यास आज जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर आला आहे.

जोगेश्‍वरी येथील एका २२ वर्षे युवतीने पोलिसांना लव्ह गुरू असलेल्या निखिल कुमार सुरेश कुमार भार्गव याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तरुणीचे आपल्याच कार्यालयातील एका तरुणासोबतचे संबंध काही दिवसांपासून बिघडले होते. त्यामुळे तरुण तिला बोलायलाही नकार देत होता. हे संबंध सुरळीत व्हावेत, अशी तरुणीची इच्छा होती.

अशातच तिला मोबाईलवर एक संदेश आला. त्यात सदर लव्ह गुरूने तुझी समस्या सोडवतो, असे आश्‍वासन तरुणीला दिले. त्याबदल्यात राजस्थानच्या सिकरमधील ‘आयसीआयसीआय’च्या एका बॅंक खात्याचा नंबर देऊन त्यात १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. नंतर हळूहळू पूजापाठ व हवनच्या नावाखाली आरोपीने तरुणीकडून एक लाख रुपये उकळले.  तरुणीच्या भावाला हा प्रकार समजताच त्याने जोगेश्‍वरी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी दोघांनाही गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात पाठविले. पोलिसांनी चौकशी करून राजस्थानमधून २२ जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update :Mumbai live : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

Maharashtra Budget: महाराष्ट्राचे नवे गुंतवणूक व सेवा धोरण जाहीर! 4 लाख उच्च-कुशल रोजगारांचे लक्ष्य; उद्योगांना काय फायदे?

Long Life Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात; सत्तरीनंतरही 'नो आजार', राहतात एकदम निरोगी

Second Solar Eclipse 2026: एक झालं आता दुसरं सूर्यग्रहण कधी? तारीख, वेळ जाणून घ्या! भारतावर याचा काय परिणाम

OC Policy: गृहनिर्माण संस्थांसाठी गुड न्यूज! बीएमसी लवकरच लागू करणार नवी ओसी पॉलिसी; नवे धोरण कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT