Eknath Shinde sakal
मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्रांच्या हस्ते झिरो कॅश काऊंटर रुग्णालयाचे लोकार्पण!

उल्हासनगर पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

कोविडच्या काळात उभारण्यात आलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा कायापालट आता सुपर स्पेशालिटी झिरो कॅश काऊंटर रुग्णालयात करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी 12 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.पालिकेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असल्याचे मानले जात आहे.

कोविडमध्ये रुग्णांना तात्काळ दाखल करण्यात यावे या दृष्टीने महानगरपालिकेने म्हारळ जवळील रिजेन्सी अंटालिया जवळ तीन मजल्याचे रुग्णालय उभारले होते.मात्र कोविड संपुष्टात आल्याने हे रुग्णालय धूळ खात पडले होते.

तेंव्हा आयुक्त अजीज शेख यांनी या रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी झिरो कॅश काऊंटर रुग्णालया मध्ये करण्याचा निर्णय घेऊन डॉ.संजित पॉल यांच्याशी करार केला.अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पॉल यांनी या रुग्णालयातील सर्व जुन्या माशीनरीच्या जागी नवीन मशिनरी लावल्या आहेत.

तसेच या रुग्णालयाला नव्या झळाळीचा लूक दिल्याने हे रुग्णालय लक्ष वेधून घेणारे दिसू लागले आहे.काम सुरू असतानाच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला होता.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने आज रविवारी आयुक्त अजीज शेख,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान,दिलीप गायकवाड,शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज,उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांच्या समवेत रुग्णालयाची पाहणी केली आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी,सहायक आयुक्त गणेश शिंपी,मनिष हिवरे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा,मुख्य बाजार परवाना विभागप्रमुख विनोद केणे,उद्यान अधिक्षिका दीप्ती पवार,सिस्टीम अनॅलिस्ट श्रद्धा बाविस्कर,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,डॉ.संजित पॉल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT