Class 9 student sexually harassed by woman Child abuse Kalyan mumbai police esakal
मुंबई

Mumbai Crime News : नववीतील विद्यार्थ्याचा महिलेकडून लैंगिक छळ

कल्याण मधील मुलावर अत्याचार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर 32 वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू व अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन मुलाला लावत महिलेने नाशिक येथे बोलावत त्याचे शोषन केले.

तसेच स्वतःचे व मुलाचे काही अश्लील व्हिडीओ देखील तिने बनविले आहेत. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात किर्ती (वय 32) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 वी मध्ये शिकणारा अल्पवयीन मुलगा हा कल्याण येथे राहणार आहे. पीडित मुलाची आत्या ही नाशिक येथे रहाते मुलाचे आत्याकडे जाणे येणे असल्याने त्याची नाशिक येथे राहणाऱ्या किर्ती हिच्याशी ओळख झाली.

सदर महिला ही मुलाच्या कुटुंबाच्या देखील ओळखीची आहे. ओळखीचा फायदा घेत किर्ती हिने मुलासोबत ओळख वाढवली. त्याला दारू व अश्लिल फिल्म बघण्याचे व्यसन लावले. दरम्यान तिने मुलाला आमिष दाखवत नाशिकला बोलावलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर देखील हॉटेलात नेऊन तिने मद्यपान केले व मुलाला देखील करायला लावले. त्यानंतर त्याच्यावर अत्याचार करत तिचे व मुलाचे काही व्हिडीओ बनविले. मुलाचे अभ्यासात लक्ष नाही तो सतत फोनवर बोलत असतो त्यामुळे मुलाच्या आईने त्याचा मोबाईल तपासला असता ही बाब उघडकीस आली.

आईने याबाबत मुलाकडे विचारणा केली असता, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मुलाच्या कबुलीनंतर आईने त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि सदर महिले विरोधात तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्या महिलेवर बाल लैंगिक शोषण कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT