Dilip Walse and Nana Patole 
मुंबई

पवारांच्या खेळीनंतर काँग्रेसकडून नवा 'गेम', दोघांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत.

एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. मात्र, कोर्टाच्या निर्णयाने राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे शरद पवार यांनी रात्रीतून कोटा वाढवल्याचं बोललं जातंय. आता काँग्रेसनेही त्यांच्या सर्व आमदारांना पाठिशी उभं केलं आहे. (Rajyasabha Election 2022)

सर्वांत पहिले राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान केलं. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मतदान केलंय. राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट आहेत. मात्र मतांच्यां कोट्यावरून ऐनवेळी सूत्र फिरवली जात असल्याचं दिसतंय.

मतांचा तुटवडा आणि कोणताही धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवला. आता काँग्रेसनेही हीच खेळी करत त्यांचे सर्व आमदार म्हणजेच एकूण ४४ जण इम्रान प्रतापगढी यांच्या दिमतीला उतरवले आहेत. ४२ मतांचा कोटा असताना काँग्रेसने देखील दोन मतं अधिकची ठेवली आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहेत. आता सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT