Kapil Patil Sakal
मुंबई

Kapil Patil : राहुल गांधी येवो किंवा इतर कोणी भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडणार नाही

2014 साली देखील राहुल गांधी यांनी भिवंडीत सभा घेतली होती. तेव्हा काही झालं नाही. आता दौरा करून काय होणार आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - 2014 साली देखील राहुल गांधी यांनी भिवंडीत सभा घेतली होती. तेव्हा काही झालं नाही. आता दौरा करून काय होणार आहे. लोक मोदीजींच्या विकासावर लक्ष ठेवून असून त्यांच्यावरील विश्वासाला लोक मत देणार आहेत. त्यामुळे राहूल गांधी यांचा दौरा होवो किंवा इतर कोणाचा भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही असे ठासून उमेदवार पाटील यांनी सांगत आपला विजय निश्चित असल्याचे जणू सांगत आहेत.

भारतीय जनता पार्टीचे राजस्थानचे खेळ मंत्री कर्नल राजवर्धन सिंह राठोड हे भिवंडी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी कल्याण येथे मंत्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री राठोड यांनी देखील काँग्रेसच्या दौऱ्या विषयी बोलताना म्हणाले, काँग्रेसजवळ ना विचार आहेत, नाही इच्छाशक्ती आहे.

पार्ट टाइम पॉलिटिशन त्यांच्याकडे आहेत. आणि मला वाटतं त्यांची एकच खेळी राहिली आहे की मोदी हेट. आणि त्या कारणामुळे ते पदभ्रष्ट देखील झाले. मोदीजींना थांबवायच्या चक्कर मध्ये राष्ट्राचा विकास थांबवायला ते लागले हेच ते विसरून गेल्याचे राठोड यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून नेते राहुल गांधी हे यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहेत. शुक्रवारी भिवंडी तसेच कळवा मुंब्रा मतदारसंघात राहुल गांधी यांची ही यात्रा होणार आहे. याविषयी खासदार तथा महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 2014 साली देखील राहुल गांधी यांनी भिवंडीत सभा घेतली होती, तेव्हा काही झालं नाही. आता दौरा करून काय होणार आहे.

लोक मोदीजींच्या विकासावर लक्ष ठेवून आहेत. विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी जनतेचा जो विश्वास जिंकलेला आहे. त्या विश्वासाला लोक मत देणार आहेत. लोकांची मानसिकता सेट आहे. 2024 ला फिर एक बार मोदी सरकार, अगली बार चारसो पार. यामुळे राहुल गांधींचा दौरा येवो नाही तर अजून काही येवो, भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: नागपुरात सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचा समर्थनात तरुणाई एकत्र

SCROLL FOR NEXT