file photo
file photo 
मुंबई

मुंबईत बांधकामाला परवानगी; मात्र अट एकच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर पालिकेने मुंबईत बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला.शहरातील कंटनमेंट झोन वगळून हि सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत आजच्या घडीला सुमारे 1 हजारच्या आसपास इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

हेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' संपवणार 
देशात ताळेबंदी लागू झाल्या पासून हा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प पडला होता. बांधकामक्षेत्रा शेती पाठोपाठ अकुशल कामगारांना रोजगार मिळतो.केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षीत ठिकाणी बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार पालिकेने सशर्त परवानगी देण्याचे धोरण तयार केले आहे. 
शहरातील 452 कंटमनेट झोन वगळता विकास नियोजन विभागा मार्फत परवानगी देणे सुरु करण्यात येणार आहे. 

नियम काय आहेत... 
- प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी मुंबई बाहेरून कामगार आणण्यास परवानगी नसेल. महापालिका क्षेत्रात उपलब्ध झालेल्या किंवा उपलब्ध असणाऱ्या कामगारांकडूनच काम करवून घेणे आवश्‍यक. 
- बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची व इतर आवश्‍यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे. 
- बांधकाम ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्‍यक. 
- कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करवून घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्‍यकता भासल्यास आवश्‍यक ते औषधोपचार करणे. 
- बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यासह मुखावरण (मास्क) नियमितपणे वापरणे बंधनकारक  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT