मुंबई

मुंबईत कोरोना नियंत्रणात, 6 दिवसात 1 हजार इमारती कोविड मुक्त

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील कोविड नियंत्रणात येत असताना इमारतींमधील रुग्णांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. गेल्या 6 दिवसात 1 हजार 24 इमारती कोविड मुक्त झाल्या आहेत. तर, 29 वस्त्यांही कोविड मुक्त झाल्या आहेत.

मुंबईत कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 157 दिवसांवर आला आहे. कोविड वाढीचा दर 0.44 टक्‍क्‍यांवर आला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळू लागल्या पासून ऑगस्ट महिन्यापासून इमारतींमधील कोविडचे रुग्ण वाढू लागले होते. सप्टेंबर अखेरपर्यंत 70 टक्के रुग्ण हे इमारतींमधील होते. मात्र, आता इमारतींमधील रुग्णांची संख्या वेगाने घटू लागली असल्याचे चित्र दिसत आहे.

महानगर पालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मुंबईतील सध्या 7 हजार 479 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने या इमारती सिल करण्यात आल्या आहेत. तर, 24 ऑक्‍टोबर रोजी 8 हजार 503 इमारतीमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने त्या सिल करण्यात आल्या होत्या. 24 सप्टेंबर रोजी 632 वस्त्यांमध्ये कोविडचे रुग्ण होते. आता 603 वस्त्यांमध्ये कोविडचे रुग्ण आहेत.


 1 लाख नागरिक बंधने मुक्त

गेल्या सहा दिवसात इमारतींमध्ये राहाणाऱ्या 1 लाख नागरिकांची कोविडची निर्बंधातून मुक्तता झाली आहे. सिल इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन वावराही काही बंधने येतात. इमारत कोविड मुक्त झाल्यानंतर ही बंधने शिथील केली जातात. दुसऱ्या बाजूला वस्त्यांमध्ये राहाणाऱ्या अवघ्या 10 हजार नागरिकांची अशा प्रकारच्या बंधनातून मुक्तता झाली आहे.

तीन महिन्यांपासून कोविडचा हॉटस्पॉट असलेल्या बोरीवलीतील रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. बोरीवलीतील 329 इमारती गेल्या सहा दिवसात कोविड मुक्त झाल्या आहेत. कांदिवली येथील 171 इमारती कोविड मुक्त झाल्या आहेत. बोरीवलीत सध्या 929 इमारतीमध्ये कोविडचे रुग्ण आहे. मालाडमध्ये 673 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आहेत. गेल्या सहा दिवसात या भागातील 14 इमारती कोविड मुक्त झाल्या आहेत.

---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona control in Mumbai one thousand buildings free of covid in 6 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Pune: मांजरीतील सराफा दुकानावर दरोडा; भिंत फोडून ३० किलो सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

SCROLL FOR NEXT