मुंबई

कोरोनाने पोलिसांना देखील बदललं, वाचा नक्की झालंय तरी काय...

सुमित बागुल

मुंबई - गेल्या काही दशकांपासून सुरु असलेली मुंबई पोलिसांची एक विशेष कॉन्फरन्स कोरोनामुळे आता बंद झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईचे पोलिस आयुक्त महिन्यातून एकदा एक अत्यंत महत्त्वाची कॉन्फरन्स घेत होते. या कॉन्फरन्सला 'क्राईम कॉन्फरन्स' असं संबोधलं जायचं. यामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशन, क्राईम ब्रांचमधील जेष्ठ इन्स्पेक्टर यांच्यापासून ते डीसीपी, ऍडिशनल डीसीपी, सर्व जॉईंट कमिशनर ऑफ पोलिस यांना येणं बंधनकारक असायचं. मात्र कोरोनाच्या काळात ही कॉन्फरन्स आता बंद झालीये.      

एका सिनिअर आयपीएस अधिकाऱ्याने एका हिंदी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला याबाबत माहिती दिलीये. कोरोनाआधी आमची पोलिस कमिशनर यांच्यासोबत त्यांच्या केबिनमध्ये मिटिंग व्हायची. मात्र मागील काही महिन्यांपासून मुंबईचे आयुक्त आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिटिंग घेतात. यामध्ये डीसीपी आणि ऍडिशनल सीपी यांचादेखील समावेश होतो. जॉईंट सीपी देखील आता अधिकाऱ्यांना अत्यंत महत्त्वाच्या परिस्थितीतच आपल्या केबिनमध्ये बोलावतात. कोरोनाच्या संवेदनशील  काळात अधिकाधिक मिटींग्स या फोनवरून किंवा कॉन्फरन्सवर करण्यावर पोलिसांचा भर आहे. गेल्या आठवड्यात पोलिस मुख्यालयातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. दोन महिन्यांपूर्वी एक डीसीपी कोरोनमुक्त झालेत.  

संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झालीये. अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे जीवही गेलाय. अशात पोलिसांमध्ये कोणतीही अनावश्यक मिटिंग समोरासमोर होऊ नये याचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. 

या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे पोलिस स्टेशन्स किंवा क्राईम ब्रान्चमध्ये पोलिसांनी एकमेकांना न भेटणं हे संभव नाही. त्यामुळे महत्त्वाचा बंदोबस्त, नाकाबंदी, कोणत्याही केस संबंधी चर्चेसाठी पोलिसांमधील मिटींग्स पूर्णपणे बंद करता येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.    

corona has changed way of working in worlds most efficient mumbai police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT