corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात 267 नव्या रुग्णांची भर, तर 4 रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 267 नवीन रुग्ण (corona new patient) सापडले. तर आज 4 रुग्ण (corona deaths) दगावले. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,39,336 इतकी झाली आहे.आज 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली (corona free patient) असून आतापर्यंत 7,18,083 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 35,707 कोविड चाचण्या (corona test) करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 86,52,262 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

 मुंबईत आज दिवसभरात 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 989 इतका झाला आहे. आज मृत झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 रुग्णाचे वय  40 ते 60 वर्षा दरम्यानचे होते तर 3 रुग्णाचे वय 60 वर्षा वरील होते. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,921 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,834 हजारांवर आला आहे.

कोरोना नियंत्रणात आल्याने मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या 0 झाली. सीलबंद इमारतींची संख्या ही कमी होऊन 22 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 3,006 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 751 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

माहीम मध्ये शून्य रुग्ण

धारावी नंतर आज माहीम मध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली.तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर धारावी माहीम मधील परिस्थिती नियंत्रणात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. माहीम एकूण रुग्णसंख्या 10,262 इतकी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 43 असून आतापर्यंत 9973 रुग्ण बरे झाले आहेत.आज धारावी आणि दादर मध्ये प्रत्येकी केवळ एका रुग्णाची भर पडली. जी उत्तरमध्ये 2 रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या 27,207 इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT