RTO sakal media
मुंबई

व्यावसायिक वाहनांना तीन महिन्यांनी मुदतवाढ द्या : 'AIMT' काँग्रेसची मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांना पाठवले पत्र

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे (corona pandemic) व्यावसायिक वाहनांच्या वैधता संपलेल्या कागदपत्रांना (Documents) वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर पर्यंत वैधता संपणाऱ्या कागदपत्रांना गृहीत धरण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (central ministry) आदेश दिले होते. त्यानुसार आता 30 सप्टेंबर रोजी मुदतवाढ संपुष्टात येणार आहे. मात्र, एकाच वेळी सर्व वाहनांच्या कागदपत्रांची वैधता काढण्याची वेळ वाहतुकदारांवर आल्यास आरटीओ कार्यालयातील (RTO) यंत्रणा कोलमळून जाईल त्यामुळे पुन्हा तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे सदस्य बाबा शिंदे (baba shinde) यांनी केंद्राकडे केली आहे.

गेल्यावर्षी पासून सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे केंद्र सरकारने व्यावसायिक वाहनांना वेळोवेळी मुदतवाढ देऊन वाहतुकदारांना दिलासा दिला आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पीयूसी, नोंदणी अशा वाहनांशी संबंधित कागदपत्रांची वैधता संपली असल्यास वाहनांवरील कारवाई आतापर्यंत टाळण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात वाहतुकदारांकडून सर्व कागदपत्रांची वैधता करण्याचे काम सुद्धा सुरू असून, हळूहळू राज्यभरातील वाहनांच्या कागदपत्रांचे वैधता करणे सुद्धा आवश्यक आहे.

मात्र, केंद्राने कागदपत्रांना दिलेली मुदतवाढ 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर एकाचवेळी आरटीओ कार्यालयांवर कामाचा ताण आणि भार येण्याची शक्यता असल्याने पुन्हा तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी वाहतुकदारांकडून केली जात आहे. यासबंधीत मागणीचे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पाठवण्यात आल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''महिलांनो बचत करा, पैसे मिळाले की लगेच...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT