file photo 
मुंबई

कोरोनामुळे चीनच्या वाहन कंपनीचा भारतातील प्रवेश रोखला 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ग्रेटर नोयडामध्ये वाहन मेळावा सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला आहे. वाहनप्रेमी आणि कंपन्या दोन वर्षांपासून या मेळाव्याची प्रतीक्षा करतात. या प्रदर्शनामध्ये चीनसह जगभरातील अनेक नामांकित वाहन कंपन्यांचे ब्रॅण्ड सहभागी होत आहेत. मात्र चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांची संख्या यंदा रोडावण्याची शक्‍यता आहे.

चीनच्या कंपन्या भारतात दाखल होत असल्याने ही भीती अधिक वाढली आहे. चीनच्या एका कंपनीचा भारत-प्रवेश यामुळे लांबला आहे. मात्र विदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याने कोरोनाचा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

2018 च्या वाहन मेळाव्यात लोकप्रिय चिनी वाहन ब्रॅण्ड एमजी मोटर्सने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. एमजीला मोठे यश मिळत असल्याने ग्रेट वॉल मोटर्ससारखे अन्य लोकप्रिय ब्रॅण्ड भारतीय बाजारपेठेत पाहिले पाउल टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता त्यांच्या सहभागावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ग्रेट वॉल मोटर्स सहभागी झालीच, तर तिला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. कोरोना व्हायरस यापूर्वीच 27 पेक्षा अधिक देशांत पसरला असून, यात 360 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. 
ग्रेट वॉल मोटर्सने एक अधिकृत निवेदन जारी करत या वाहन मेळाव्यात सहभागी होणार नसल्याचे कळवले आहे.

तथापि, कंपनीचे प्रतिनिधी यापूर्वीच भारतात आले असून, तेही वाहन मेळाव्यात दाखल होणार नाहीत. सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. 


कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण केरळमध्ये सापडले असून, चीनमध्ये प्रवासासाठी जाऊ नये, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चीनमधून आलेल्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

१९ वर्षांचा झाला iPhone; सुरुवातीला नव्हते व्हिडिओ रेकॉर्डिंग ! जाणून घ्या Apple च्या पहिल्या स्मार्टफोनची गोष्ट...

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT