मुंबई

कोरोनामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत गणेशमुर्ती विक्रीत घट; खबरदारी म्हणून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

प्रसाद जोशी


वसई - वसईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात खबरदारी म्हणून वसई विरार महापालिका व पोलीस प्रशासनाने उपयोजनांबाबत पावले उचलली आहेत. तसेच विसर्जनाबाबत नियम घालून दिले आहे.

यंदा मिरवणूक, गर्दी न करता उत्साह साजरा करण्याचे आवाहन शासनाने तसेच प्रशासनाने नागरिकांना केले आहे. याला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी मूर्ती न आणण्याचे ठरवले. काहींनी घरीच बाप्पांची मूर्ती तयार केली आहे. तर विसर्जन कृत्रिम पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असल्याने तलावावर गर्दी कमी दिसणार आहे. यावर्षी सार्वजनिक व घरगुती एकूण २६ हजार मूर्तींचे आगमन झाले आहे.

गेल्या वर्षी एकूण 30 हजार 675 मूर्ती वसई तालुक्यात होत्या. मात्र यावेळी प्रमाण कमी झाले आहे. महापालिका प्रशासन, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून नऊ प्रभागात कृत्रिम पद्धतीने विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. गणपती विसर्जनासाठी 73 ठिकाणी तलावाची व्यवस्था असते. मात्र यंदा फक्त 30 ठिकाणीच विसर्जन केले जाणार आहे.

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे तलाव तसेच सार्वजनिक मंडळात गर्दी करू नये यासाठी आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो परिसरातच मूर्तीचे विसर्जन करावे. तलावाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT