Mumbai-BMC
Mumbai-BMC 
मुंबई

Corona Update: मुंबईत 789 नवे रुग्ण, तर 10 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

रूग्ण दुपटीचा कालावधी 726 दिवसांवर; धारावीत 2 तर दादरमध्ये 13 नवीन रुग्ण

मुंबई: शहरात गेल्या 24 तासांत 789 नवीन रुग्ण (New Cases) सापडले. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) कोरोनाग्रस्तांची (Coronavirus Update) एकूण संख्या 7,24,113 इतकी झाली आहे. दिवसभरात 542 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,91,670 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची (Deaths) नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 348 इतका झाला आहे. एकूण मृत्यूंपैकी 5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष तर 7 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 च्या खाली होते. तर 3 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते आणि 6 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. (Mumbai Corona Update 789 new Cases found 10 people died)

रूग्ण दुपटीचा कालावधी 726 दिवसांवर

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 726 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95% आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 14,810 हजारांवर आला आहे. मुंबईत 11 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 87 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,791 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 843 करण्यात आले.

धारावीत 2 तर दादरमध्ये 13 नवीन रुग्ण

धारावीमध्ये आज 2 रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 6877 झाली आहे. माहीम मध्ये आज 7 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 9950 झाले आहेत. दादर मध्ये 13 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9613 वर पोचला आहे. जी उत्तर मध्ये आज 22 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,440 झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT