corona vaccination sakal media
मुंबई

मुंबईत उद्यापासून लसीकरण सुरळीत; 'BMC' कडे लशींचा साठा उपलब्ध

भाग्यश्री भुवड

मुंबई :  मुंबईत (Mumbai) उद्यापासून पुन्हा लसीकरण (corona vaccination) पूर्वपदावर येणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक केंद्रांवर लसीचा (insufficient vaccine) अभाव होता. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी पालिकेला (bmc) सरकारकडून डोस (dose available) उपलब्ध झाले होते. त्या डोसचा वापर शनिवार ते गुरुवारपर्यंत केला गेला. त्या दरम्यान, मुंबईत एका दिवसांत 2 लाख नागरिकांना लसीकरणाचा टप्पा पार झाला. मात्र, त्यानंतर डोसची पुन्हा कमतरता भासू लागली. त्यानुसार, गुरुवारीही फक्त 39 केंद्रांवर लसीकरण झाले. मात्र, आता पुन्हा पालिकेला लसीचे डोस उपलब्ध झाले असून मुंबईत लसीकरण पूर्वपदावर (vaccination start) येणार आहे.

पालिकेला पुण्यातून एकूण 1 लाख 41 हजार 90 डोस डोस प्राप्त झाले आहेत. त्यात 1 लाख 34 हजार कोव्हिशील्डचे  डोस देण्यात आले असून 07 हजार 90 कोव्हॅक्सिनचे डोस आहेत. जवळपास सर्वच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू राहील. काल रात्री उशिरा पालिकेला लसींचे डोस मिळाले आहेत. त्यानुसार, आज सर्व लसीकरण केंद्रांना लसींचे डोस पुरवले जातील आणि उद्यापासून पुन्हा लसीकरण पूर्ववत होईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेच्या काही लसीकरण केंद्रांकडे गुरुवारपर्यंतचे डोस होते. पण, त्यातही बऱ्याच ठिकाणी लसीकरण बंद होते. तर, गुरुवारी फक्त मोजक्याच ठिकाणी लसीकरण सुरु राहिले. मात्र, आजच पालिकेला लसीचा साठा उपलब्ध झाला असून उद्यापासून पुन्हा पूर्ववत लसीकरण सर्व केंद्रांवर सुरू राहिल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात मिळालेले डोस

1 लाख 50 हजार कोव्हिशील्ड

10 हजार 240 कोव्हॅक्सिन 

 आज मिळालेले डोस

 1 लाख 34 हजार कोव्हिशील्ड

7 हजार 090 कोव्हॅक्सिन

पालिकेला एकूण 1 लाख 41 हजार डोस मिळाले आहेत. मुंबईत लसीचा पुरवठा करण्यात आला असून उद्यापासून पुन्हा सुरळीत लसीकरण होईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT