Vaccination Pregnant woman sakal media
मुंबई

कल्याण-डोंबिवलीत 540 गरोदर महिलांचे कोरोना लसीकरण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : बाळाला स्तनपान करते...गरोदर आहे तर कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) कशी घ्यावी असा प्रश्न आजही अनेक महिलांच्या मनात आहे. त्यातही कल्याण डोंबिवलीत (kalyan-dombivali) 540 गरोदर महिलांनी (pregnant women's) व 148 स्तनदा मातांनी लस घेतली आहे. गरोदर महिला, स्तनदा माता यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांतच सुविधा (facilities in hospital) करण्यात आली असून आत्तापर्यंत कोणालाही काही त्रास झालेला नाही. यामुळे महिलांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी असे आवाहन पालिका आरोग्य विभागाच्या (KDMC authorities) वतीने करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाचा प्रदूर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे लसीकरणावर जोर दिला जात आहे. गरोदर आणि स्तनदा मातांना जुलैपासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी गरोदर महिलांनी लस घ्यावी की नाही? याविषयी महिलांमध्ये अद्यापही गैरसमज आहेत. महिला स्वतःहून लस घेण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गरोदर महिला व स्तनदा मतांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. रुग्णालयात येणाऱ्या महिलांना तेथील डॉक्टर विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न दूर करून त्यांना लस देत आहेत.

"खासगी रुग्णालयात आत्तापर्यंत 540 गरोदर महिला व 148 स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील महिलांना कोणताही त्रास झाला नसून महिलांनी पुढे येत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. ही लस घेतल्याने गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल."

- डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT